माजी नगरसेवक हत्या प्रकरणी अरुण गवळी दोषी

मुंबई: माजी नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी कुख्यात गुंड आणि अखिल भारतीय सेनेचा अध्यक्ष अरुण गवळी याच्यासह १२ जणांना संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक विशेष न्यायालयाने दोषी ठरविले आहे. लवकरच त्यांना शिक्षा सुनावली जाईल.

शिवसेनेचे मुंबईतील माजी नगरसेवक कमलाकर जामसंडीकर यांचा राजकीय वैमनस्यातून सन २००७ मध्ये खून झाला होता. महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत उमेदवाराकडून गवळी याला जामसंडीकर यांची सुपारी देण्यात आली. त्यानुसार गवळी याने अशोककुमार जैस्वाल, नरेंद्र आणि विजय गिरी याना अडीच लाख रुपये; रिव्हॉल्वर आणि चाकू देऊन खून करण्यास पाठविले; असा पोलिसांचा आरोप आहे.

या खटल्यात १२ जणांना दोषी ठरविण्यात आले तर तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. एक आरोपी मरण पावला आहे.

Leave a Comment