चिदंबरम यांना सर्वोच्य न्यालयकडुन क्लीन चीट

नवी दिल्ली – टू जी स्पेक्‍ट्रम वाटपामध्ये पी. चिदंबरम यांनी गैरव्यवहार केल्याचा कोणताही सबळ पुरावा नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने जनता पक्षाचे अध्यक्ष सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे चिदंबरम यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल करणार असल्याचे स्वामी यांनी जाहीर केले.

टू जी स्पेक्‍ट्रम वाटपामध्ये पी. चिदंबरम यांनी गैरव्यवहार केल्याचा कोणताही सबळ पुरावा सापडला नाही, असे सांगत सुप्रीम कोर्टाने त्यांच्या विरोधातील दोन्ही याचिका फेटाळून लावल्या. चिंदबरम यांच्या विरोधात सबळ पुरावे नसल्याने त्यांच्याविरोधात खटला दाखल केला जाऊन शकत नाही. चिदंबरम यांना या घोटाळ्याप्रकरणी काहीही आर्थिक फायदा झालेला दिसत नाही. तसेच अर्थमंत्री म्हणूनही त्यांनी अधिकाराचा वापर केल्याचेही दिसत नाही, असे सुप्रीम कोर्टाने याचिकावर निर्णय देताना सांगितले.