नवी दिल्ली: चर्चेद्वारे मार्ग काढण्याचे केंद्र सरकारचे आवाहन धुडकावून लावत भारतीय जनता पक्ष कोळसा खाण घोटाळा प्रकरणी पंतप्रधानांच्या राजीनाम्याबाबत ठाम आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे सलग पाच दिवस संसदेचे कामकाज ठप्प आहे.

लोकसभेचे कामकाज स्थगित झाल्यावर गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि संसदीय कामकाज मंत्री पवनकुमार बन्सल यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांची भेट घेतली. उपनेते गोपीनाथ मुंडे आणि भाजप प्रवक्ते शाहनवाझ हुसेन हे देशील यावेळी उपस्थित होते. भाजपने राजीनाम्याच्या मागणीवर अडून न राहता संसदेचे कामकाज सुरू राहण्यासाठी सहकार्य करावे. कोळसा खाण घोटाळा प्रकरणी संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार आहे; असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. मात्र स्वराज आपल्या पक्षाच्या भूमिकेवर ठाम राहील्या.
यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते अरुण जेटली, मुंडे आणि हुसेन यांची बैठक पार पडली. पंतप्रधान मनमोहन सिंग राजीनामा देईपर्यंत संसदेचे कामकाज होऊ न देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.