नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या जाज्ज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेल्या किल्ल्यांना पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनविण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि केंद्रीय पुरातत्व विभाग यांच्यात लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील किल्ल्यांवर पर्यटनाच्या सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री छगन भुजबळ, मुख्य सचिव के. के. बाठिया, पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री कुमारी शैलजा यांची भेट घेतली. या भेटीत पुरातत्व विभाग आणि राज्यशासनाच्या सहकार्यातून किल्ल्यांची देखभाल, दुरुस्ती आणि पर्यटकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सुरुवातीच्या टप्प्यात लोहगड, रायगड, शिवनेरी, राजमाची, तोरणा आणि सिंहगड या किल्ल्यांवर पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या सागरी किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी केंद्रशासनाकडून पुरातत्व विभागाला ७ कोटी ६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असूनही अद्याप काम सुरू झाले नसल्याकडे सांस्कृतिक मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावेळी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे काम सुरू होईल; अशी ग्वाही कुमारी शैलजा यांनी दिली.