किंग फिशर एअरलाईन्स बंद पडण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली: कर्जाच्या बोजाखाली खचलेली किंग फिशर एअरलाईन्स कंपनी बंद पडण्याचा धोका सेंटर फॉर एशिया पेसिफिक एविएशन या संस्थेने आपल्या तिमाही अहवालात व्यक्त केला आहे.

येत्या दोन महिन्यात कंपनीला ३ हजार ३३० कोटी रुपयांचे भांडवल उपलब्ध न झाल्यास ही कंपनी चालू शकणार नाही; असा दावा संस्थेने केला आहे. सध्या कंपनीच्या दैनंदिन खर्चाची तरतूद कंपनीच्या प्रवर्तकांकडून मिळणार्या रकमेतून होत आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत प्रवर्तकांनी कंपनीला १३ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी दिला. त्यामुळे किंग फिशर एअरलाईन्सचा गाडा कसाबसा सुरू आहे.

मात्र कंपनी सुरळीत चालण्यासाठी नवीन भांडवलाशिवाय पर्याय नाही; असे संस्थेने अहवालात नमूद केले आहे.