सलमान – कॅटची मस्त केमेस्ट्री

अभिनेता सलमान खानच्या मागील चार चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय केला आहे. यामुळे सलमानच्या कबीर खान दिग्दर्शित ‘एक था टायगर’ कडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. याशिवाय खास आकर्षण म्हणजे सल्लू मिया आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड कॅटची जोडी. ‘एक था टायगर’ विषयी थोडक्यात सांगायचे तर ही कथा दोन सिक्रेट एजंटस्ची अहे. टायगर (सलमान खान) भारताचची गुप्तचर यंत्रणा असलेल्या ‘रॉ’ साठी काम करत असतो. मागील बारा वर्षापासून टायगर सतत कोणत्यान् कोणत्या कामगिरीवर अविरतपणे कार्यरत आहे. भारतीय मिसाइलची महत्त्वपूर्ण माहिती एक शास्त्रज्ञ पाकिस्तानी गुप्तहेर संघटना असलेल्या आयएसआयला देणार असल्याचा संशय भारत सरकारला असतो. त्यामुळे त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी टायगर आणि त्याचा सहकारी गोपी (रणवीर शौरी) यांना मिशनवर पाठविले जाते. हा शास्त्रत्र आता विद्यापीठात प्रोफेसर म्हणून काम करतोय. या प्रोफेसरच्या जवळ जाऊन त्याच्या हालचाली टीपण्याचे काम टायगर करणार आहे. या प्रोफेसरच्या जवळ जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जोया (कॅटरिना कैफ) आहे. ती त्या विद्यापीठातील नृत्यशाखेची विद्यार्थिनी असून प्रोफेसरच्या घराची केअरटेकर म्हणून काम करते. टायगर – जोयाच्या भेटीमधून या थ्रिलर चित्रपटाचा रोमँटिक प्रवास सुरू होतो. टायगरची कथा निर्माता, दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी लिहिली आहे. दिग्दर्शक कबीर खानचा हा चित्रपट सल्लूमियाच्या चाहतावर्ग कॅश करण्याच्या हेतूनेच तयार करण्यात आल्याचे दिसते. यामुळेच कोणतेही तकवितर्क लढविण्यासाठी प्रेक्षकांच्या डो*याला ताप न देता चित्रपटाची मांडणी करण्यात आली आहे. शत्रू असलेले दोन देश आणि त्यांच्या गुप्तचर यंत्रणामधील दोन व्य*तीची प्रेम कहाणी यामुळे कथेत अनेक खळबळजनक घटना पाहायला मिळणार याची आपल्याला कल्पना येते. कथेची मांडणी करताना प्रेमकहाणी आणि शिस्तबद्ध गुप्तचर यंत्रणा यांची योग्य सांगड दिग्दर्शकाने घातली आहे. चित्रपटाच्या पहिल्या दृष्यातच चित्रपट कशा पद्धतीने पुढे सरकत जाणार याची कल्पना येते. एक चांगली गोष्ट म्हणजे सलमानच्या दबंग, रेडी, बॉडीगार्ड आणि सिघम, राऊडी राठौड या चित्रपटांच्या हिदी रिमेकमध्ये दाखविण्यात आलेल्या दाक्षिणात्य स्टाईलच्या अॅक्शन दृष्यांना कबीरने फाटा दिला आहे, यामुळे अवास्तवीक अशी हाणामारीची दृष्ये दिसत नाहीत. तरीदेखील प्रेक्षकांना रोमांचित करणार्‍या अॅक्शन दृष्यांचा भरणा या चित्रपटात आहे. सलमान खान बरोबरच कॅटरिनाची उंच उंच इमारतींवरून उड्या मारण्याची दृष्ये आपल्याला पाहायला मिळतात. चित्रपटाच्या कथेला दमदार पटकथेची जोड देतानाच उत्तम संवादाची मांडणी करण्यात आलेली आहे. ‘दुनिया के दो सौ एक देश है, मगर टायगर को केवल एक पाकिस्तानी लडकी से ही इश्क हुआ’ अशा संवादामधून थेट प्रेक्षकांच्या भावनांना हात घातला आहे. कथेला संगीताची दमदार साथ मिळाली आहे. ‘बंजारा’, ‘माशाल्ला माशाल्ला’ ही गाणी सध्या गाजताहेत. चित्रपटाचा नायक भारतीय, नायिका पाकिस्तानी असली तरी चित्रपटाचे शुटिंग डब्लिन, इस्ताम्बूल आणि हवाना या तीन देशात झाले आहे.सलमान आणि कॅटरिना भोवतीच संपूर्ण चित्रपटाची कथा फिरते. सलमानच्या फक्त बॉडीचा उपयोग करून न घेता कबीरने सलमानचा अभिनय प्रेक्षकांसमोर आणला आहे. सलमान आपल्या अभिनयाने प्रभावीत करतो. कॅटरिनाचा लूक छान आहे, तिने साकारलेली अॅ*शनदृष्येही चांगली आहेत. एकंदरीत सलमान – कॅटची अप्रतिम केमेस्ट्री जुळून आलेला ‘एक था टायगर’ एकदा पाहायला हरकत नाही. चित्रपट -एक था टायगर निर्माता – आदित्य चोप्रा दिग्दर्शक – कबीर खान संगीत – सोहेल सेन, साजिद – वाजीद कलाकार – सलमान खान, कतरिना कैङ्ग, रणवीर शौरी, गिरिश कर्नाड – भूपाल पंडित

Leave a Comment