कॅग अहवाल पूर्वग्रहदूषित: वीरप्पा मोईली

नवी दिल्ली: कॅगने कोळसा खाण वाटप आणि उर्जा क्षेत्राबाबत सादर केलेले अहवाल पूर्वग्रहदूषित, अपुर्‍या माहितीवर आधारित आणि सरकारच्या धोरणात्मक अधिकाराचा अधिक्षेप करणारे आहेत; असा आरोप केंद्रीय उर्जा आणि कॉर्पोरेट अफेअर्स मंत्री वीरप्पा मोईली यांनी केला.

दि एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दरबारी सेठ स्मृती व्याख्यानानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कॅगच्या नुकत्याच संसदेत सादर केलेल्या अहवालात कोळसा खाण वाटप, उर्जा क्षेत्राला कोळसा पुरवठा आणि दिल्ली विमानतळाचे नूतनीकरण यामध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाचे ३ कोटी ६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत मोईली यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कॅगच्या अहवालाचा आम्ही अभ्यास करीत आहोत. मात्र हे अहवाल इतके संदिग्ध, पूर्वग्रहदूषित, अपुर्‍या ज्ञानावर आधारित आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे आहेत की त्यांच्या शंकांना कोणीच समाधानकारक उत्तरे देऊ शकत नाहीत; असा आरोप मोईली यांनी केला. देशातील उर्जा क्षेत्राची सद्य स्थिती आणि उर्जा व कोळसा यांचे परस्पर संबंध याचा विचारही केहने केला नसल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. सध्याच्या परिस्थितीचा डोळसपणे अभ्यास केला कॅगलाच आपल्य अहवालातील त्रुटी लक्षात येऊ शकतात; असा दावाही त्यांनी केला.

Leave a Comment