लष्करातील जवानाचे ’शोले स्टाईल’ आंदोलन!

नवी दिल्ली,२२ ऑगस्ट-शोले चित्रपटातील धर्मेंद्रचे पाण्याच्या टाकीवरील दृश्य आजही सगळ्यांच्या लक्षात असेल. प्रेयसीच्या ’मौसी’ला पटवण्यासाठी नाही, पण लष्करातील आपल्या अधिकार्‍यांकडून मागण्या मान्य करुन घेण्यासाठी लष्करातील एक जवान के. मुत्थू (४०) यानेदेखील धर्मेंद्रचाच फंडा वापरला आहे.

तो चक्क रेल्वेच्या टॉवरवर चढून बसला आहे. या घटनेला आज चार दिवस उलटून गेले, तरी मागण्या मान्य झाल्याशिवाय खाली उतरण्याची त्याची तयारी नाही. दरम्यान, मुथ्थूच्या या प्रकारामुळे रेल्वे प्रशासनाची कुचंबणा झाली आहे. मुथ्थू ज्या टॉवरवर चढला आहे, तो रेल्वेचा सूक्ष्मलहरी (मायक्रोव्हेव) प्रक्षेपण मनोरा आहे.
सुटीसाठी वरिष्ठांकडून सहकार्य मिळत नाही.

आपली दिल्ली येथे सत्त*ीने बदली करण्यात आली आहे, अशा त्याच्या तक्रारी आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत टॉवरवरून उतरण्यास त्याने स्पष्ट नकार दिला आहे. मुथ्थू याने २००२ मध्ये लष्करातफर्े झालेल्या वेट लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते.

मुथ्थूच्या या प्रकारामुळे रेल्वे प्रशासनाची कुचंबणा झाली आहे. मुथ्थू ज्या टॉवरवर चढला आहे, तो रेल्वेचा सूक्ष्मलहरी (मायक्रोव्हेव) प्रक्षेपण मनोरा आहे. हा परिसर निषिद्ध क्षेत्र असूनही, कोणत्याही अडथळ्याविना मुथ्थू टॉवरवर चढला.

रेल्वे प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी ही सुरक्षा व्यवस्थेतील चूक असल्याचे मान्य केले आहे. तरीदेखील या प्रकरणी रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले नाहीत.

Leave a Comment