राज ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप करून रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पुतळ्याचे दहन केले.

मंगळवारी मनसेने काढलेल्या मोर्चानंतर झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी लखनौला बुद्धांच्या मूर्तीची तोडफोड होऊनही गप्प बसल्याबद्दल रिपब्लिकन नेते रामदास आठवले, रा. सु. गवई आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांच्यावर तोफ डागली. डॉ. आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेबाबत या नेत्यांच्या आग्रही भूमिकेबद्दल; हे नेते केवळ इंदू मिल, इंदू मिल करीत बसले आहेत; असे विधान ठाकरे यांनी केले.

या विधानामुळे संतप्त रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी वांद्रे येथे ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी निदर्शने करीत ठाकरे यांच्या विरोधात घोषणाही दिल्या.

Leave a Comment