मोदींविरोधात काँग्रेस आक्रमक

अहमदाबाद,२२ ऑगस्ट-गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत पायउतार करण्यासाठी काँग्रेसने विशेष रणनीती आखली आहे. त्यासाठी मोदींविरोधात आक्रमक प्रचारमोहीम राबवण्यासही काँग्रेसने सुरुवात केली आहे. गुजरातमधील जनतेच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून थेट जनसंफ, विविध यात्रा-आंदोलनांचे आयोजन करण्यासही काँग्रेसने आतापासूनच सुरुवात केली आहे.

डिसेंबर महिन्यात गुजरात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. गेल्या १४ वर्षापासून गुजरातमध्ये भाजपचे सरकार असून २००१ पासून मोदी मुख्यमंत्रीपदावर आहेत. त्यामुळे यंदा मोदींना मुख्यमंत्रीपदावरून हटवायचेच, असा विडा काँग्रेसने उचलला आहे.

’’विधानसभा निवडणुकीसाठीची काँग्रेसची यावेळची रणनीती पूर्णपणे वेगळी आहे. आतापर्यंत राज्यातील काँग्रेस नेत्यांचा प्रचार तितकासा अभ्यासपूर्वक नव्हता. जाहिराती किंवा पत्रके काढून केंद्रातील नेतृत्वामुळे चमत्कार होईल, असे त्यांना वाटायचे. मात्र या निवडणुकीसाठी काँग्रेस नियोजनपूर्वक मैदानात उतरले आहे. यात्रा आणि रॅलींच्या माध्यमातून राज्यस्तरीय नेते यावेळी गुजरातच्या जनतेशी थेट संफ साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत,’’ असे गुजरातमधील काँग्रेसचे प्रवत्त*े मनीष दोषी यांनी सांगितले.

मोदींची अरेरावी लोकशाहीची मूल्ये कशा प्रकारे पायदळी तुडवत आहे, यावरही काँग्रेसने सर्वाधित लक्ष केंद्रित केले आहे. त्याचप्रमाणे बेरोजगारी, भ्रष्टाचार, गरीब-मध्यमवर्गीय जनतेच्या समस्यांकडे सत्ताधार्‍यांचे झालेले दुर्लक्ष असे अनेक मुद्दे प्रचार मोहिमेद्वारे राबवले जात असल्याचे दोषींनी स्पष्ट केले.

Leave a Comment