मी फक्त फक्त महाराष्ट्रच धर्म जाणतो : राज ठाकरे

मुंबई,२२ ऑगस्ट-पोलिसांवर हात टाकणारा कोणत्याही धर्माचा असो त्याला तिथल्या तिथे फोडून काढला पाहिजे. सीएसटीवर झालेल्या दंग्यात जखमी झालेल पोलिस फक्त महाराष्ट्र तील होते आणि मी फत्त* फक्त महाराष्ट्र धर्म जाणतो, असे सांगत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले.

११ ऑगस्ट रोजी सीएसटीवर रझा अकादमीने काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले आणि पोलिसांना मोठ्या प्रमाणावर हल्ला करण्यात आला. प्रसारमाध्यमांनाही लक्ष करण्यात आले. त्याचा निषेध करण्यासाठी मनसेने आज राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आझाद मैदानावर प्रचंड मोर्चा काढला. मोर्चानंतर झालेल्या सभेत राज ठाकरे बोलत होते.

पंधरा ते वीस मिनिटांच्या आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. पोलिसांच्या, माध्यमांच्या हितासाठी लढणारा पक्ष अशी प्रतिमा निर्माण करतानाच त्यांनी आपण शिवसेनेचे हिंदू कार्ड वापरणार नाही हेही स्पष्ट केले. आपण मुस्लिमांना विरोध नाही, तर देशद्रोही शत्त*ींना आणि परप्रांतीय समाजकंटकांना ठेचून काढू असे सांगत आपण मुस्लिमविरोधी नाही हे स्पष्ट केले.
राज यांच्या भाषणातील मुद्दे
-पोलिस असोत, प्रसारमाध्यमे असोत किंवा मराठी माणसे असोत जेव्हा त्याच्यावर कोणतेही संकट येईल तेव्हा अशी मोठी ताकद दिसली पाहिजे. या असल्या लोकांची फक्त महाराष्ट्र कडे वाकडा डोळा करून बघायची हिंमत होता कामा नये. यासाठी हा मोर्चा आहे.
-हा मोर्चा होऊ नये यासाठी अनेक प्रकारे अडथळे आणण्याचे प्रयत्न होत होते. यामागे मुंबईचे पोलिस आयुत्त* अरुप पटनाइक यांचा हात आहे. मला सांगितले गेले की तुमच्या गाड्या अडवण्याचे प्रयत्न होतील. कशासाठी ? लोकशाही मार्गाने निषेधही करायचा नाही ? मोर्चाही काढायचा नाही का ? मग ही अडवणूक कशासाठी ? शांततामय मार्गाने मोर्चाला परवानगी देत नाही. पण त्या रझा अकादमीला देता ?
– राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील आमच्या बाळा नांदगावकरला सांगतात, मी काय दांडुका घेऊन उभे राहायला हवे का ? ते म्हणतात की कायदा सुव्यवस्थता बिघडवणार्‍यांना बघून घेऊ. मग त्या दिवशी काय झाले होते ? शेवटी प्रत्येक गोष्टीची सीमारेषा असते. काहीही झाले तर पोलिसांवर हात नाही टाकायचा. उद्या पोलिसांचे खच्चीकरण केल्यावर सामान्य माणसांनी कुठे जायचे ?
-दंगलखोर मारताहेत आणि मराठी पोलिस कॉन्स्टेबल मार खाताहेत. पोलिस भगिनींवर अत्याचार होतोय आणि काही पोलिस त्या दंगलखोरांना पकडत होते तर पटनाईक गुन्हेगारांना सोडायला सांगतात ? ते दगड कुठून आले ? सर्व माहित असूनही डोळेझाक करण्यात आली. म्हणून थोडीतरी लाज उरली असेल तर, अरुप पटनाइक राजीनामा द्या, आर आर. पाटील राजीनामा द्या.
-आम्ही असे वागणार नाही, आम्ही आमच्याच मुंबईतील गाड्या आम्ही फोडणार नाही. त्या रझा अकादमीचा ट*ॅक रेकॉर्ड काढा. बघा भिवंडीमध्ये त्या अबू आझमीची भडकाऊ भाषणे चालतात आणि माझी भाषणे भडकाऊ असतील म्हणून त्यावर बंदी घालतात.
-मी सांगतोय, जे आले होते ते फक्त महाराष्ट्रतले नाहीत, महाराष्ट*ाचे बाहेरचे आहेत. हा बघा, बांगलादेशचा पासपोर्ट. हा तिथे त्या गोंधळाच्या इथे सापडलाय. हा वन वे पासपोर्ट आहे. फत्त* इथे यायचे जायचे नाही. या घुसखोरांचे महाराष्ट*ात अड्डे झाले आहेत. यांच्या मोहल्ल्याचा भविष्यात आपल्याला त्रास होणार आहे.
– बाबरी मशिदीची प्रतिक्रिया मुंबईत उमटली. आता आसाममधल्या दंग्याची प्रतिक्रिया मुंबईनंतर बिहार, झारखंड, लखनऊमध्ये उमटली. काय केले त्यांनी ? उत्तरप्रदेशात या पाकिस्तानी, बांगलादेशातील मुस्लिमांनी गौतम बुद्धाच्या प्रतिमेची विटंबना केली. तेव्हा कुठे गेल्या मायावती ? कुठे गेले रामदास आठवले ? कुठे गेले रा. सु. गवई ? कुठे गेले प्रकाश आंबेडकर ? यांना फत्त* इंदू मिल दिसते.
सीएसटी दंगलीमागे परप्रांतीयच
’छत्रपती शिवाजी टर्मीनसवर झालेल्या दंगलीत परप्रांतातून आलेल्या समाजकंटकांचा हात होता. त्यांचा महाराष्ट*ाशी काहीही संबंध नव्हता,’ असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला.
राज यांनी फक्त महाराष्ट्रतील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेसाठी उत्तर भारतीयांना जबाबदार धरले. सीएसटीवरील दंगलीमागे परप्रांतीय असल्याचा पुरावा देताना राज यांनी सीएसटीवर सापडलेला सिंगल एन्ट*ी बांगलादेशी पासपोर्टच भर सभेत दाखवला.
मुसलमानांना भडकावणारे आमदार अबू आझमी यांची राज यांनी यावेळी अक्षरशः सालटी काढली. सीएसटीवरील गोळीबारात ठार झालेल्या एका दंगेखोराच्या कुटुंबाला आझमींनी दीड लाख रुपये दिले. मग जखमी पोलिसांना मदत का दिली नाही? ’याच आझमींनी भडकावल्यानंतर भिवंडीतील मुसलमानांनी दोन पोलीस कॉन्स्टेबलना ठेचून मारले होते, याचा अर्थ समजून घ्या, असेही ते म्हणाले. ’बाबरी मशीद पडल्याची प्रतिक्रिया फत्त* मुंबईत उमटते आणि मुंबईतील दंगलीचे पडसाद लखनौमध्ये उमटतात. याचे कारण तिथल्या हजारो लोकांनी मुंबईत येऊन आपले मोहल्ले आणि अड्डे तयार केले आहेत. त्याच अड्ड्यांच्या जीवावर आझमी दोन मतदारसंघातून निवडून येतात, असा आरोप करून हे अड्डे भविष्यात आपल्याला फार महाग पडतील, असा इशारा राज यांनी दिला.
पोलिसाकडून राजना गुलाबपुष्प
भाषण झाल्यावर कॉन्स्टेबल प्रमोद तावडे या पोलिसाने व्यासपीठावर जाऊन राज ठाकरे यांना गुलाबपुष्प भेट दिले. त्यानंतर बोलताना तावडे म्हणाले, की मला कारवाईची भीती नाही. मी स्वयंस्फूर्तीने हे पाऊल उचलले आहे. राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी मी व्यासपीठावर आलो होतो.

Leave a Comment