मालिका विजयाने होणार नाही भारताचा फायदा

न्यूझीलंडसोबत गुरुवारपासून सुरु होत असलेल्या कसोटी मालिकेत भारताने जरी २-० अशी क्लीन स्वीप दिली तरी जागतिक क्रमवारीतील स्थानात काहीच बदल होणार नाही. भारत क्रमवारीत पाचव्या स्थानावर राहणार आहे. जागतिक कसोटी क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेने नुकताच इंग्लंडचा पराभव करून अव्वलस्थान पटकाविले आहे.

जागतिक कसोटी क्रमवारीत भारतीय संघाची सध्या १०४ गुणासह पाचव्या स्थानापर्यंत घसरण झाली आहे. भारत संघ सध्या दक्षिण आफ्रिकेपेक्षा १६ गुणाने पाठीमागे आहे. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया संघ सध्या अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानवर आहेत तर पाकिस्तान संघ सध्या १०९ गुनासह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे या मालिकेत भारतीय संघाकडे सध्या तरी स्थानात बदल करण्याची कुठलीच संधी नाही.

या कसोटी मालिकेत भारताने जरी न्यूझीलंडला २-० अशी क्लीन स्वीप दिली तर भारताचे केवळ दोन गुण वाढून १०६ गुण होणार आहेत. त्यामुळे स्थानात कुठ्लाच बदल होणार नाही. धोनीच्या संघाने ही मालिका जर १-० ने जिंकली तर एकच गुण वाढणार आहे. मात्र दुसरीकडे भारताने ही मालिका जर ०-२ हरली तर भारत ९७ गुनासह क्रमवारी घसरणार आहे. मालिका जर १-१ अथवा ०-० अशी बरोबरीत सुटली तर भारताचे १०१ गुण होणार आहेत.

Leave a Comment