मंगळावरील भूकंप मोजण्यासाठी नासाचे इनसाइट मिशन

वॉशिंग्टन,२२ ऑगस्ट-अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेच्या क्युरॉसिटी या रोबोटने मंगळाच्या पृष्ठभागाचे कलर छायाचित्र पाठवून १० दिवस जात नाहीत तोच मंगळावरील भूकंपांची नोंद घेण्यासाठी इनसाइट मिशन आखण्यात आल्याचे नासाने सांगितले आहे. आतापर्यंत मंगळाच्या भूगर्भाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही.

यासंदर्भात नासाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, की पृथ्वीप्रमाणे मंगळावर फॉल्ट लाइन्स आहेत का? त्या किती संवेदनशील आहेत? तेथे कशा प्रकारचे भूकंप होतात? या रहस्यांची उकल करण्यासाठी नासाने इनसाइट मिशन आखले आहे. मार्च २०१६ मध्ये एक रोबोट मंगळावर पाठविण्यात येणार असून या ग्रहाच्या भूगर्भातील हालचाली, तेथील तापमानाचा प्रवाह आदींची नोंद घेण्यात येणार आहे.

नासाच्या विज्ञान मिशनच्या मुख्यालयाचे सहयोगी प्रशासक जॉन ग्रुन्सफेल्ड म्हणाले, की पृथ्वीच्या भूगर्भाची माहिती मिळविण्यासाठी सेस्मॉलॉजी ही एक प्रमाण पद्धत आहे. अशी पद्धत वापरून मंगळाच्या भूगर्भाची माहिती काढण्याचा प्रयत्न केला जाईल. आतापर्यंत आपल्याला मंगळाच्या भूगर्भाविषयी काहीही माहिती नाही.

Leave a Comment