
नवी दिल्ली: आरामदायी तरीही मजबूत अशा स्पोर्ट्स कारच्या शौकिनांसाठी एक खूषखबर आहे. वैशिष्ट्यपूर्ण बांधणी, अजोड शक्ती आणि आलिशान डिझाईन यासाठी जगभरात विख्यात असलेल्या कॉन्क्वेस्ट व्हेईकल्सची ‘इव्हेड’ ही आलीशान गाडी या वर्षाखेरीस भारतीय बाजारपेठेत दाखल होत आहे. तिची किंमतही तिच्या रुबाबासाराखीच भारदस्त आहे; साडेआठ कोटी रुपये फक्त! इव्हेड ही भारतात सध्या उपलब्ध असलेल्या गाड्यांपैकी सर्वात महाग गाडी असणार आहे.
