’पोलिसांवर हात टाकाल तर याद राखा’

मुंबई,२२ ऑगस्ट-आम्ही मर्यादा ओलांडली नाही, ओलांडणारही नाही, मात्र पोलिसांवर हात टाकाल तर याद राखा, असा इशारा देत राज ठाकरेंनी, अरुप पटनायक आणि आर आर पाटील यांच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार केला.

’मुंबई हिंसाचाराला सर्वस्वी गृहमंत्री आर आर पाटील आणि पोलिस आयुत्त* आरुप पटनायक जबाबदार आहेत. त्यामुळे पटनायक आणि आबा तुम्हाला थोडी जरी लाज उरली असेल, तर राजीनामा द्या’ अशा शब्दात राज यांनी राजीनाम्याची मागणी केली.

’मुंबई हिंसाचारात राज्यातील पोलिस आणि महिला पोलिसांना मारहाण झाली. त्या माता भगिणींच्यासाठीच मी मोर्चात उतरलो आहे. मराठीकडून हिंदुत्वाकडे जाण्याचा प्रश्नच नाही, मला फत्त* एकच धर्म समजतो, ’महाराष्ट* धर्म’, अशी गर्जना राज यांनी केली.

पोलिसांवर हात टाकणारा कोणत्याही धर्माचा असेल, त्याला तिथल्या तिथे फोडून काढला पाहिजे. आमच्या आमदाराला जबरदस्त मारहाण झाली, पण आम्ही आमच्या आमदाराला सत्त* ताकीद दिली, पोलिसांवर हात उचलायचा नाही.

मुंबईत राजरझा अकादमीच्या मोर्चाला परवानगी मिळते, मग आमच्या मोर्चाला का नाही, असा सवाल राज यांनी केला.
आझाद मैदानावरील हिंसाचारा बांगलादेशी नागरिकही होते, यासाठी राज ठाकरेंनी पासपोर्ट दाखवून पुरावा दिला
आम्ही मर्यादा ओलांडली नाही, आणि ओलांडणार ही नाही, पोलिसांवर हात नाही टाकायचा असेही राज म्हणाले.

Leave a Comment