मुंबई,२२ ऑगस्ट-बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन आता फेसबुकच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना भेटणार आहेत. फेसबुकवर बिग बी यांनी आपले अकाउंट सुरु केले असून अर्ध्या तासात तब्बल आठ लाख लोकांनी त्यांच्या पेजला लाईक केले आहे.

बिग बी यांनी स्वतः ही माहिती ट्विटरवर दिली आहे. त्यांनी टिवट केले आहे की, ’यप्पी…मैं फेसबुक पर आ गया’. इतक्या कमी वेळात एवढ्या लोकांनी त्यांच्या पेजला लाईक केल्यामुळे बिग बी खूप खुश झाले आहेत.
फेसबुकवर बिग बी यांनी त्यांच्या येणार्या चित्रपटांची माहिती, व्हिडीओ, आणि काही पर्सनल फोटो अपलोड केले आहेत.
करोडो लोकांच्या मनावर राज्य करणार्या अमिताभ बच्चन यांचे फेसबुकवर चाहत्यांनी स्वागत केले आहे. आतापर्यंत त्यांच्या पेजला ७८२,०३२ लोकांनी लाईक केले आहे. ट्विटरवर बिग बी यांचे ३३ लाख फॉलोअर्स आहेत.