राज्यसभा उपाध्यक्षपदी पी. जे. कुरियन

नवी दिल्ली: राज्यसभा उपाध्यक्षपदी पी. जे. कुरियन यांची बिनविरोध निवड झाली.

राज्यसभेचे उपाध्यक्ष के. रेहमान खान यांची मुदत संपल्याने हे पद रिकामे होते. कुरियन यांच्या विरोधात इतर कोणीही अर्ज न केल्याने त्यांना बिनविरोध निवडण्यात आले.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह विरोधे पक्ष नेते अरुण जेटली यांनी कुरियन यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला. तो एकमताने मंजूर करण्यात आला.

Leave a Comment