मुंबई हिंसाचाराबाबत पोलिसांची बोटचेपी भूमिका

मुंबई: छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे रझा अकादमीच्या मोर्चा दरम्यान झालेल्या हिंसाचाराबाबत दंगेखोरांची ओळख पटूनही पोलीस बोटचेपी भूमिका घेत असल्याची माहिती पुढे येत आहे. या दंगेखोरांना अटक केल्यास अधिक दंगाधोपा होण्याची भीती खुद्द पोलीसच व्यक्त करीत आहेत.

मुंबई येथे आझाद मैदान, छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे रझा अकादमीच्या मोर्चाला लागलेल्या हिंसक वळणात सहभागी असलेल्या २४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रत्यक्षात या प्रकरणी दोषी असलेल्या ४० जणांची ओळख पोलिसांना छायाचित्रणाद्वारे पटली असून यापैकी बहुतेक जण मुंब्रा, गोवंडी, कुर्ला, वांद्रे या परिसरातील आहेत.

मात्र या संशयितांना अटक केल्यास पुन्हा दंगा उसळेल या भीतीने पोलिसांनी या हल्लेखोरांना रान मोकळे ठेवले आहे. या प्रकरणाचा तपास म्हणून केवळ संयोजकांचे जबाब घेतले जात असून यावेळी व्यासपीठावरून भाषण केलेल्या वक्त्यांना जबाबासाठी बोलाविले आहे.

पोलिसांच्या बोटचेप्या धोरणामुळे या हिंसाचारातील प्याद्यांवर किरकोळ कारवाई होऊन मुख्य सूत्रधार नामानिराळे रहातील; अशी भीती पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनीच व्यक्त केली आहे.

Leave a Comment