नवी दिल्ली: केंद्र सरकार भारतीय जनता पक्षाची सरकारे असलेल्या राज्यांच्या विकासात अडथळे आणून भेदभाव करीत असल्याचा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी केला.
भाजपशासित राज्यांबाबत केंद्राचा दुजाभाव: सिन्हा
भाजपाशासित सरकारांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीच्या समारोपानंतर सिन्हा पत्रकारांशी बोलत होते.
वास्तविक केंद्राने कोणताही भेदभाव न करता भाजपशासित राज्यांच्या विकासाला हातभार लावणे गरजेचे आहे. मात्र केंद्र सरकार या राज्यांच्या प्रगतीबाबत असूया बाळगून त्यांच्या प्रगतीत अडथळा आणत आहे; असा आरोप सिन्हा यांनी केला.
भ्रष्टाचार, अनिर्बंध भांडवलशाही आणि अधिकारांचे केंद्रीकरण हीच राज्यकर्त्यांनी केलेली विकासाची व्याख्या आहे; असा आरोपही सिन्हा यांनी केला.