बेताल वर्मांनी केले महागाईचे समर्थन

नवी दिल्ली: महागाई वाढल्यामुळे केंद्र सरकारवर विरोधी पक्षांप्रमाणेच सर्वसामान्य जनताही टीकेची झोड उठवीत असताना केंद्रीय बेनीप्रसाद वर्मा यांनी महागाईचे निर्लज्ज समर्थन केले आहे. महागाई वाढेल तसा शेतकऱ्यांचा फायदा होईल; त्यामुळे महागाई वाढणे फायद्याचे आहे; असा वर्मा यांचा दावा आहे.

वर्मा हे कायम आपल्या वादग्रस्त विधानांमुळे स्वत: वादग्रस्त बनले आहेत आणि आपल्या पक्षालाही अडचणीत आणण्यात कारणीभूत ठरले आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीत वर्मा यांच्या विधानांची चांगलीच किंमत काँग्रेसला मोजावी लागली. त्यामुळे त्यांच्या विधानांना पक्षातही फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. मात्र महागाईचे समर्थन करणारे वर्मा यांचे वक्तव्य पक्षाला महाग पडू शकते.

खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना वाढत्या महागाईबद्दल चिंता व्यक्त केली होती. मात्र वर्मा यांनी महागाईचे समर्थन केले आहे.

महागाई वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनांना वाढीव किंमत मिळते. डाळीचे भाव वाढले तर शेतकऱ्यांचा फायदाच आहे; अशा शब्दात वर्मा यांनी महागाईचे समर्थन केले आहे.

Leave a Comment