विमानाची देखभाल

जगाच्या प्रगतीबरोबर वाढत चाललेला आणि उत्तम, भरपूर पगाराची नोकरी देणारा व्यवसाय म्हणजे विमानाची देखभाल. हा व्यवसाय किती वाढत चालला आहे याची आपल्याला कल्पना नसते. परंतु आज जगातल्या विविध देशांकडे मालाची आणि प्रवाशांची वाहतूक करणारी निरनिराळ्या प्रकारची पाच लाख विमाने आहेत. त्याचबरोबर काही बड्या उद्योगपतींनी आणि व्यापक संपर्क असलेल्या कंपन्यांनी स्वत:ची छोटी विमाने घेतलेली आहेत. जगात अशा छोट्या विमानांची संख्या ४० लाख आहे.

भारत ही अशा विमानांची वेगाने विकसित होणारी बाजारपेठ आहे. अशा विमान कंपन्यांना विमानाची देखभाल करणार्या तंत्रज्ञांची तीव्र टंचाई जाणवत आहे. त्यामुळे विमानाच्या देखभालीचे शिक्षण घेणार्या तरुणांना ही एक उत्तम रोजगार संधी आहे.

सध्या भारतातल्या विविध विमान कंपन्यांना अशी माणसे तातडीने हवी आहेत. या कंपन्यांमध्ये हे शिक्षण घेऊन जाणार्या विद्यार्थ्यांना दरमहा २५ ते ४० हजार रुपये एवढे वेतन मिळते आणि हे वेतन दरमहा १ लाख २० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. या संबंधातल्या प्रशिक्षणाचे खास अभ्यासक्रम उपलब्ध नाहीत.

विमानाच्या बाबतीत दोन प्रकारच्या नोकर्या असतात. विमान चालवणारी एक आणि विमानाची देखभाल करणारी एक. त्यातल्या विमान चालविणार्यांना पायलट असे म्हणतात आणि पायलट होण्यासाठी घ्यावे लागणारे प्रशिक्षण अतिशय महागडे असते. ज्याला साधारणत: ८ ते १० लाख रुपये खर्च येतो.

मात्र विमानाची दुसरी शाखा म्हणजे देखभाल करणार्या लोकांची शाखा. तिला मात्र प्रशिक्षणासाठी केवळ सव्वा लाख रुपये खर्च येतो. विमानाचा रखरखाव करणार्या या लोकांसाठी मोठा अभ्यासक्रम नाही. परंतु काही छोट्या छोट्या संस्थांचे छोटे छोटे अभ्यासक्रम आहेत आणि हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर डायरेक्टर ऑफ जनरल ऍन्ड सिव्हील एरियेशन या संस्थेचे परवाना कम् प्रमाणपत्र मिळवावे लागते. हे प्रमाणपत्र मिळणे म्हणजेच नोकरीची पात्रता.

हे प्रशिक्षण घेण्यासाठी घेणारा उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा लागतो. खालील संस्था हे प्रमाणपत्र देतात. १) स्कूल ऑफ एव्हीएशन सायन्स ऍन्ड टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एअरोनॉटिक्स् ऍन्ड इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एअरोनॉटीकल सायन्स, नवी दिल्ली २) फ्लायटेक एव्हियेशन अकॅडमी, इन्स्टिट्यूट ऑफ एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनिअरींग, राजीव गांधी एव्हियेशन अकॅडमी ऍन्ड हैदराबाद कॉलेज ऑफ एव्हियेशन टेक, हैदराबाद. ३) एअरोनॉटिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट लखनौ ४) नेहरू कॉलेज ऑफ एअरोनॉटिक्स् ऍन्ड अप्लाईड सायन्सेस, कोईमतूर, तमिळनाडू. ५) एअरक्राफ्ट मेन्टेनन्स ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिट्यूट, कोलकत्ता ६) व्हीएसएम एअरोस्पेस ऍन्ड हिंदुस्थान एव्हियेशन अकॅडमी, बंगळूर. 

 

Leave a Comment