मल्टीमीडिया – पदव्युत्तर कोर्स

सध्याच्या युगाचे वर्णन आइस एज असे केले जाते. या इंग्रजी शब्दातील आय सी ई या तीन शब्दांवरून हे वर्णन आलेले आहे. या जगामध्ये सध्या इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन आणि एंटरटेनमेंट या तीन गोष्टींना महत्व आहे. त्यामुळे मल्टीमीडिया हा अभ्यासक्रम आजच्या युगामध्ये अतिशय महत्वाचा आणि सर्वस्पर्शी ठरलेला आहे. विशेषत: ज्या तरुणांनी विज्ञान किंवा अभियांत्रिकी विषयाची पदवी प्राप्त केलेली असेल त्यांना चांगली नोकरी मिळण्याच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम जास्त उपयुक्त ठरणारा आहे. कारण त्याला चांगली डिमांड आहे. विविध संस्थांमध्ये माध्यम आणि संवाद साधने त्याचबरोबर इंटरनेट इत्यादींचे नियंत्रण करायचे असते त्या संस्थांमध्ये अशा पदवीधरांना खूप कामे मिळू शकतात.

सध्याच्या काळामध्ये वरच्या पदावरच्या नोकर्या मिळविण्यासाठी पदव्युत्तर शिक्षणाची अधिक गरज असते. म्हणून या क्षेत्रात शिरू इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी शक्यतो पदव्युत्तर पदवी घेऊन या क्षेत्रात यावे. अशा प्रकारच्या पदव्या देणार्या संस्था देशात अनेक ठिकाणी आहेत. हैदराबाद येथील इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ कंप्यूटर ग्राफिक्स् या संस्थेने जेएनटीयू या संस्थेच्या मदतीने मल्टीमीडिया या विषयातली एम.एस्सी. ही पदवी देणारा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणार्या उमेदवाराने कोणताही पदवी अभ्यासक्रम किमान ५५ टक्के गुण घेऊन पूर्ण केलेला असावा.

अधिक माहितीसाठी www.iacg.inf या संकेतस्थळाशी संपर्क साधावा. त्याशिवाय चेन्नईच्या अण्णा युनिर्व्हर्सिटीमध्ये मल्टीमीडिया या विषयाची एम.टेक् पदवी देण्याची सोय आहे. या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांकडे सी.एस.ई., आय.टी., ई.ई.ई., ई.सी.ई. किंवा इलेक्टॉनिक्स् या विषयासह उत्तीर्ण केलेली बी.ई. किंवा बी.टेक् पदवी असण्याची गरज आहे. या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतली जाते किंवा गेट परीक्षा उत्तीर्ण होणार्यांनाही प्रवेश दिला जातो. अधिक माहितीसाठी  www.anna.univ.edu या संकेतस्थळाशी संपर्क साधावा. अशाच प्रकारचा एम.टेक् इन मल्टीमीडिया टेक्नॉलॉजी असा पदवी अभ्यासक्रम एस.आर.एम. विद्यापीठ, कांचीपुरम् या तमिळनाडूतल्या संस्थेनेही सुरू केलेला आहे.

या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराकडे बी.ई. किंवा बी.टेक्. ही पदवी असण्याची गरज आहे तसेच कंप्यूटर सायन्स किंवा आय.टी. हे विषय घेऊन एम.एस्सी. झालेले विद्यार्थी किंवा एम.सी.ए. झालेले विद्यार्थीही या अभ्यासक्रमास अर्ज करू शकतात. अर्थात या संस्थेतला प्रवेश ऑल इंडिया इंजिनिअरींग एन्टरन्स एक्झाममधील मार्कावरून ठरवला जात असतो. अधिक माहितीसाठी  www.srmuniv. ac.in या संकेतस्थळाशी संपर्क साधावा. 

 

Leave a Comment