डिझेल कारच्या उत्पादन शुल्कात लवकरंच वाढ

नवी दिल्ली: डिझेलवर चालणार्‍या कारवरील उत्पादन शुल्कात भरीव वाढ करण्याचा विचार सरकार गांभीर्‍याने करीत असून लवकरच याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल; अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री एस.एस. पलानिमणिक्कम यांनी राज्यसभेत दिली.

डिझेलच्या कारमुळे अधिक प्रमाणात प्रदूषण होते. डिझेलवर अनुदान मिळत असल्याने या अनुदानाचा कारमालकांना फायदा होतो. प्रत्यक्षात अनुदानाच्या लाभाची या कार मालकांना काय आवश्यकता; असा सवाल करीत पलानिमणिक्कम यांनी उत्पादन शुल्क वाढीचे सुतोवाच केले.

Leave a Comment