ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना राष्ट्रपतींनी गौरविले

नवी दिल्ली: ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंकडून प्रेरणा घेऊन भारतीय युवकांनी जिंकण्याचा निर्धार केला तेरा भारत क्रीडा क्षेत्रातही अग्रेसर बनेल; अशी आशा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केली.

ऑलिम्पिक विजेते खेळाडू गगन नारंग, सायना नेहवाल, विजय कुमार, मेरी कोम, योगेश्वर दत्त आणि सुशील कुमार यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या सहा जणांनी देशाच्या क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास घडविला आहे; अशा शब्दात राष्ट्रपतींनी या खेळाडूंचे कौतुक केले.

भारतासारख्या १.२ अब्ज लोकसंख्येच्या देशाला ऑलिम्पिकच्या पदकतालिकेत ५५ व्या क्रमांकावर राहावे लागते याबद्दल खंत व्यक्त करतानाच राष्ट्रपतींनी; आता युवक खेळाकडे करियर म्हणून बघू लागले आहेत. अशा खेळाडूंचा निर्धारच देशाला क्रीडा क्षेत्रात अग्रेसर बनवेल; असा विश्वासही व्यक्त केला.

Leave a Comment