रेल्वे इंजिनियरिंग

rail

खरे तर अभियांत्रिकी किंवा बी.टेक.च्या कोणत्याही पदवीधराला रेल्वेची देखभाल, दुरुस्ती यांची माहिती असतेच आणि अनेक पदवीधर रेल्वेत अनेक प्रकारच्या नोकर्‍या करीतही असतात. पण भारतीय रेल्वे ही नोकर्‍या देणारी भारतातली सर्वात मोठी यंत्रणा आहे  हे विसरता येत नाही. रेल्वेचेही एक वेगळे तंत्रज्ञान आहे. ते आपणच शिकवावे असे रेल्वे मंत्रालयाला वाटते. रेल्वेत अभियांत्रिकीशी संबंधित अशी किती तरी आव्हानात्मक कामे असतात. त्यासाठी आपले तंत्रज्ञ आपणच तयार केले पाहिजेत असा विचार करून रेल्वे मंत्रालयाने डिप्लोमा इन इंजिननियरिंग हा स्वतंत्र अभ्यासक्रम निर्माण केला आहे. (डीआरइ). या अभ्यासक्रमाचे संचालन इन्स्टिट्यूट ऑफ परमनंट वे इंजिनियरिंग (आय.पी.डब्लयू.ई) या  सस्थेतर्फे केले जाते. हा अभ्यासक्रम रेल्वे मंत्रालयाने तयार केलेला आहे. 

आता आपल्या देशातल्या रेल्वेपुढे वेगवान गाड्यांचा नवा प्रस्ताव आला आहे. आता आहे त्या पायाभूत सोयींच्या साहाय्याने आपली रेल्वे ताशी फार तर १०० ते १२५ किलोमीटर वेगाने धावू शकते. तीही काही ठराविक मार्गांवरच. पण आपल्याला कधी ना कधी जपान आणि चीनच्या धर्तीवर ताशी ३०० किलो मीटर्सपेक्षा अधिक वेगाने धावणार्‍या गाड्या निर्माण कराव्याच लागतील. त्यासाठी अब्जावधी रुपये खर्चुन नवे मार्ग टाकावे लागतील आणि एंजिनेही नवी आणावी लागतील. यातून अभियांत्रिकीच्या क्षेत्रात लाखो नवे रोजगार निर्माण होतील. त्या दृष्टीने रेल्वेचा हा पूर्णपणे रेल्वेला वाहिलेला अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे. हा अभ्यासक्रम पुरा करायला तसा सोपा आहे कारण तो दूरशिक्षणाच्या पद्धतीने  (डिस्टन्स एज्युकेशन) घेतला जात असतो. तो अभ्यासक्रम बाहेरून आवश्यक त्या पात्रता पुरा करणारा कोणीही करू शकतोच पण रेल्वेचे कर्मचारीही त्याला प्रवेश घेऊ शकतात. तो पदविका अभ्यासक्रम असून एक वर्षाचा आहे. एक वर्ष म्हणजे दोन सेमीस्टर्स. प्रवेश घेऊ इच्छिणारांनी सरकारमान्य संस्थेतून किमान तीन वर्षांचा कोणत्याही विषयाचा इंजिनियरिंगचा डिप्लोमा पूर्ण केलेला असला पाहिजे. किंवा विज्ञान शाखेचा पदवीधर किंवा इंजिनियरिंग विषयाचा पदवीधरही चालतो. किंवा कोणत्याही विषयाचा पदवीधर असावा ज्या पदवी परीक्षेच्या +२ स्तरावर मॅथेमॅटिक्स आणि विज्ञान हे विषय घेतलेले असावेत.

या  अभ्यासक्रमाला रेल्वेत काम करणारे किंवा रेल्वेशी संबंधित काही संस्थांत  काम करणारे कर्मचारी पात्र असतात. त्यांनाही वरील प्रमाणे शैक्षणिक पात्रता धारण केलेली असावी लागेलच पण कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा लागेल. या अभ्यासक्रमाचा प्रवेश फॉर्मसाठी आयपीडब्ल्यूइ, जी. ११, रेल भवन, रायसिना रोड, नई दिल्ली, ११० ११८ या पत्त्यावर संपर्क साधावा. फोन ०११ २३३८७९१५. इ.मेल ipwe@sify.com