राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी गेहेना जेरबंद

पुणे: राष्ट्रध्वज कमरेला गुंडाळून फोटोशूट करणारी अशिष्ट मॉडेल गेहेना वशिष्ट हिला पुणे पोलिसांनी राष्ट्रध्वजाच्या अवमान प्रकरणी अटक केली आहे. आपल्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचे कबुली तिने दिली आहे.

दोन वर्षापूर्वी आपल्या मित्रांच्या सांगण्यानुसार आपण हे फोटोशूट केल्याचे गेहेनाने पोलिसांना सांगितले. ही छायाचित्र कुठेही प्रसिद्ध करण्यात आली नाहीत. मात्र आपला लॅपटॉप एका मित्राकडे होता. त्यानेच ही छायाचित्र काढल्याचा बभ्रा केला; असेही तिने सांगितले.

तिच्या या फोटोशूटनंतर तिच्याबद्दल नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप निर्माण झाला. मुंबईत तर काही संपप्त कार्यकर्त्यांनी तिला मारहाणही केली होती.

गेहेना आपल्या कामाच्या दर्जापेक्षा सनसनाटी वागण्यासाठीच प्रसिद्ध आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळाल्यास मी माध्यमांसमोर नग्न होईन; असे तिने सांगितले होते. त्यानुसार प्रसिद्धीमाध्यमांकडे आपली नग्न छायाचित्र पाठवून आपण आपला शब्द पाळल्याचा तिचा दावा आहे.

Leave a Comment