न्यूझीलंडचा संघ भारतात दाखल

न्यूझीलंडचा क्रिकेट संघ शनिवारी सकाळी भारतात दाखल झाला आहे. याठिकाणी न्यूझीलंड संघ भारताविरूद्ध दोन कसोटी सामन्याची मालिका व ट्वेटी-२० सामने खेळणार आहे. बऱ्याच दिवसानंतर न्यूझीलंडसोबत कसोटी सामने होणार असल्याने याबाबत सर्वाना उत्सुकता लागून राहिली आहे.

न्यूझीलंड संघातील काही प्रमुख खेळाडू शनिवारी सकाळी दाखल झाले आहेत. २३ ते २७ ऑगस्ट दरम्यान पहिला कसोटी सामना दोन्ही संघादरम्यान खेळला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना ३१ ऑगस्टपासून बेंगलोर येथील चिनास्वामी स्टेडियमवर खेळाला जाणार आहे. या दोन सामान्यानंतर दोन्ही संघादरम्यान ट्वेटी-२० सामन्याची मालिका खेळली जाणार आहे. या सामन्यानंतर भारतीय संघ ट्वेटी-२० विश्वचषकासाठी रवाना होणार आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघासोबतचे हे सामने भारतासाठी सराव सामने ठरणार आहेत.

दरम्यान ट्वेटी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघासाठी नवीन जर्सी तयार करण्यात आली असून तिचा शुभारंभ दोनच दिवसापूर्वी संघातील खेळाडूच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

Leave a Comment