कोलकाता: आपल्या हट्टी आणि मनमानी कारभाराचे रोज नवे किस्से पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बेनर्जी घडवून आणत आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा बदलून त्यांनी मनमानीचा आणखी एक नमुना दाखविला आहे.

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक रॉयटर्स बिल्डिंग येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची परंपरा आहे. ध्वजवंदन झाल्यावर मुख्यमंत्री राज्यातील जनतेला संबोधित करतात आणि कार्यक्रमाची समाप्ती होते; असा रिवाज आहे.
मात्र ममतादिदींनी यावर्षी ध्वजवंदनाचे ठिकाण बदलून रेड रोड येथे ध्वजवंदन केले. त्यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर कार्यक्रमाचा समारोप न होता एका विशेष संचलनाचेही आयोजन करण्यात आले. या संचलनात कोलकाता पोलीस, पश्चिम बंगाल पोलीस, शीघ्र कृती दल आणि विद्यार्थ्यांच्या पथकांनी भाग घेतला.