पीटरसनला ठेवले संघाबाहेर

इंग्लंड संघातील वादग्रस्त फलंदाज केविन पीटरसनला गुरुवारपासून दक्षिण आफ्रीका सोबत लॉर्डस खेळण्यात येणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी संघात बेयरस्ट्रोला स्थान देण्यात आले आहे. पीटरसनने दुसऱ्या कसोटी सामण्यात दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूना एसएमएस पाठवून इंग्लंडचा कर्णधार एडयू स्ट्रोस व कोच एंडी फ्लावर यांच्या बाबतीत काही आपत्तीजनक भाषा वापरली असल्याने त्याला वगळण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनने घेतला असल्याचे समजते.

ही मलिका सुरु होण्यापूर्वीच पीटरसनने हा कसोटी सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो असे संकेत दिले होते. मात्र पीटरसननला त्यापूर्वीच इंग्लंडसंघातून निवड समितीने डच्चू दिला आहे. कसोटी सामन्यातील जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी इंग्लंड संघाच्या दृष्टीने हा सामना कुठल्याही स्थितीत जिंकावा लागणार आहे. अन्यथा त्यांना अव्वलस्थान गमवावे लागणार आहे.

काही दिवसापूर्वीच इंग्लंड संघाचा माजी कर्णधार व धडाकेबाज फलंदाज केविन पीटरसनने वनडे व ट्वेंटी २० संघातून निवृत्ती जाहीर केली होती. भारतातील आयपीएलमध्ये खेळल्यामुळे त्याला वनडे व ट्वेंटी२० संघातून निवृत्ती जाहीर करावी लागली असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. एकंदरीत पीटरसनची वादग्रस्त कारकीर्द पाहता आता त्याला लवकरच कसोटी संघातून निवृत्ती घ्यावी लागणार आहे.

Leave a Comment