आयसीसी पुरस्कारामध्ये कोहली, सचिन यांना नामांकन

दुबई, दि. १३ – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्यावतीने देण्यात येणार्‍या वार्षीक पुरस्कार सोहळ्यामध्ये भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली आघाडीवर आहेत. सध्या जबरदस्त फॉममध्ये असलेला कोहलीने एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावा केल्या आहेत.

या वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू या पुरस्कारासाठी कोहलीला नामांकन मिळाले आहे. तर सचिन तेंडुलकरला पुन्हा एकदा आयसीसी पिपल्स चॉईस पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. याआधी २०१० मध्ये सचिनला हा पुरस्कार मिळाला आहे. कोहलीसोबत कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि गौतम गंभीर यांना देखील एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

कसोटी क्रिकेटमधील पुरस्कारासाठी मात्र एकाही भारतीय खेळाडूला नामांकन मिळालेले नाही.

आयसीसीकडून दिल्या जाणार्‍या या पुरस्कारांमध्ये नामांकन मिळालेल्या खेळाडूची निवड जगभरातील क्रिकेटचाहते करु शकतात. आपल्या आवडत्या खेळाडूला मत देण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

Leave a Comment