आकाशात झुंडीप्रमाणे दिसणार ड्रोन विमान

वॉशिंग्टन, दि.१४ – अमेरिकन विमान निर्माता कंपनी बोइंगच्या इंजिनियरांनी एक नवीन तंत्रज्ञानाचा विकास केला. ज्याच्या मदतीने ड्रोन विमान परिचालन खर्चात कमतरता येईल. हे कीड्याच्या झुंडीप्रमाणे आपल्या कामाची शिघ्रतेने अंमलबजावणी करू शकेल. 

बोइंगद्वारे सांगण्यात आले, ’जॉन हॉपकिंस युनिवर्सिटीच्या संशोधकांनी जूनमध्ये ओरेगानमधील दोन स्कॅनईगल मानवरहित विमानच्या मदतीने अनेक दिवसांपर्यंत स्वार्म तंत्रज्ञानाचे परीक्षण केले. जमिनीवर उपस्थित ऑपरेटर फक्त लॅपटॉप व मिलिट्री रेडियोच्या प्रयोगाने स्वार्म तंत्रज्ञान असणारे मानवरहित विमान (यूएवी) ला एखाद्या जमिनीशिवाय नियंत्रण केंद्राचे कमांड व काम देऊ शकते. तसेच सूचना प्राप्त केली जाऊ शकते.   

बोइंग फेंटम वर्क्सचे प्रोग्रामचे संचालक गेबरिएल सेंटेंडेर म्हणाले की, स्वार्म तंत्रज्ञानाने कम धोका व कमी खर्चावर जास्त अभियानाची अंमलजावणी केली जाऊ शकेल. या तंत्रज्ञानाने लढाऊ विमान भविष्यात लढाईदरम्यान सरळ एयरबॉर्न यूएवीहून शिघ्रतेने गुप्त, निरीक्षणात्मक व प्राथमिक आक्रमण संबंधित माहिती प्राप्त करू शकतील. 

सध्या ते जमीनीवर स्थित नियंत्रण केंद्राने माहिती प्राप्त करतात आणि यात वेळही लागतो. असोसिएशन ऑफ अनमॅन्ड हवीकल सिस्टम्स इंटरनॅशनल (एयूवीएसआय) अनमॅन्ड सिस्टम्स नॉर्थ अमेरिका २०१२ संमेलनात या तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले जाईल.