सुशीलकुमारने जिंकली रौप्यपदकासह कुस्तीशौकिनांची मने

लंडनः भारतीय मल्ल सुशीलकुमार याने वेगवान खेळाच्या जोरावर ऑलिंपिक कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली आणि रौप्यपदकावर आपले नाव कोरले. अंतिम लढतीत त्याला जपानच्या योनेमित्सु याच्याकडून पराभूत व्हावे लगले तरीही सुशीलकुमारने भारतीय आणि जगभरातील कुस्तीशौकिनांची मने मात्र जिंकली.

रविवारी झालेल्या कुस्ती स्पर्धेत सुशीलकुमारने उपांत्यपूर्व फेरीपेक्षा उपांत्य फेरीत आपल्या खेळाचा दर्जा उंचावून आपल्या जिद्द आणि गुणवत्तेची प्रचिती दिली.

सुशीलकुमारने आपला प्रतिस्पर्धी कझाकिस्तानचा मल्ल अझुरेक तांतारोव्ह याच्याबरोबर चांगली लढत देऊन पहिल्या फेरीत विजय प्राप्त केला. दुसर्‍या फेरीत प्रतिस्पर्ध्याने त्याच्यावर मात करून १-१ अशी बरोबरी साधली. तरीही तिसर्‍या फेरीत मनोबल कायम ठेऊन सुशीलकुमारने वेगवान खेळ केला आणि ३-१ असा अंतिम विजय मिळवून रौप्य पदकावर आपले नाव कोरले.

सुशीलकुमारच्या चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या असून सुशीलकुमार देशाला सुवर्णपदक मिळवून देईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Comment