पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्याची घाई नाही: मुरलीमनोहर जोशी

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्यास अजून बराच कालावधी हातात असून या संबंधी घाई करण्याची भारतीय जनता पक्षाला अजिबात आवश्यकता नाही; असे मत पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी रविवारी व्यक्त केले.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वतीने पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून आपले नाव जाहीर व्हावे यासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव त्यात आघाडीवर आहे. मात्र रालोआमधील महत्वाचा घटक पक्ष असलेल्या जनता दल (यु)चे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याची मागणी करतानाच या पदासाठी मोदी यांचे नाव नको; अशी मेख मारून ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर जोशी यांनी हे विधान केले आहे.

पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करावा; ही नितीश कुमार यांची मागणी योग्यच आहे. मात्र त्यासाठी घाई करण्याची आवश्यकता नाही; असेही जोशी यांनी नमूद केले आहे.

Leave a Comment