नवी मुम्बईत लक्झरी हॉटेल्सची रांग

नवी मुंबई दि.१२ – नव्या मुंबईत येऊ घातलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय केव्हेन्शन हे दोन मोठे प्रकल्प लक्षात घेऊन या परिसरात फाईव्ह स्टार हॉटेल्सची संख्या चांगलीच वाढू लागली आहे. परिसच्या लूव्र समूहाचे रॉयल ट्युलिप हे फाईव्ह स्टार हॉटेल हे खारघर येथे १३ ऑगस्ट पासून सुरू होत असून या भागातले हे पाचवे स्टार हॉटेल आहे.

विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अजून प्राथमिक अवस्थेत आहे. मात्र मुंबईच्या तुलनेत येथे जागा आणि राहणीमान थोडे स्वस्त आहे. भविष्यात होणारा विकास आणि त्यामुळे जागाना येणारी मागणी सेवा क्षेत्राने आधीच ओळखली आहे व त्यामुळेच येथे अनेक नामवंत हॉटेल चेन आपल्या शाखा सुरू करत आहेत असे ट्युलीपचे अध्यक्ष सुरेश वाधवा म्हणाले. नवी मुंबईत येत्या काही काळात १२ पेक्षा अधिक स्टार हॉटेल्स सुरू होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

रिलायन्स ओबेरॉयचे ट्रायडन्त, तसेच मेरीयट, शेरेटनची हॉटेलशी काही काळात येथे सुरू होत आहेत.विमानतळ आणि कन्व्हेन्शन सेंटर लक्षात घेतले तर इथे आगामी काळात लाखो प्रवासी रोज येणार आणि त्यांच्यासाठी हॉटेल्स लागणार आहेत. त्यामुळे येथे व्यवसाय संधी मोठी आहे असे शेरेटनचे सुमित कांत यांनी सांगितले. आत्ताच येथे प्रवासी तसेच कार्पोरेट कडून चांगला प्रतिसाद मिळत आहे असेही ते म्हणाले.

Leave a Comment