अण्णांच्या एकांतवासास समाप्ती

राळेगणसिद्धी मागील चार दिवसापासून सुरू असलेला अण्णा हजारेंचा एकांतवास शनिवारी समाप्त झाला. अण्णांनी भ्रष्टारचार विरोधी मंचचे कामकाज पाहिले. इतकेच नव्हे तर अण्णांनी सकाळपासून दुपारपर्यंत आपल्या कार्यालयात बसून मागील चर दिवसाच्या घटनेची माहिती घेतली. 

अण्णांच्या नावे जे पत्र देशभरातून आले होते, अण्णांनी त्यावरही आपल्या सहकार्यांशी चर्चा केली. अण्णांनी आपल्या येणार्या ब्लॉगवरही काम केले. अण्णा आपल्या या नवीन ब्लॉगच्या माध्यमानेच जनतेशी संवाद करतील.

अण्णाचे सहकारी सुरेश पठारेंनी सांगितले की, अण्णा आता ब्लॉगच्या माध्यमानेच आपला पक्ष ठेवतील.’

तीन ते चार दिवसांत अण्णाचे हे ब्लॉग पब्लिश होईल. उल्लेखनीय आहे की, जंतर-मंतरने राळेगणला परतून अण्णा आपल्या मंदिराच्या खोलीत एकांतवासमध्ये गेले. आलेल्या माहिती नुसार, अण्णांना राजकारणात येणे पसंत नाही. अण्णांनी एकांतवासने बाहेर येऊन आपले काम सुरू केले. परंतु ते मीडियाशी दूरच राहिले.