हेस्टींग्जची फेसबुक शेअर्समध्ये १० लाख $ ची गुंतवणूक

नेटफ्लेक्स कंपनीचे सीईओ रीड हेस्टींग्ज याने फेसबुकचे १० लाख डॉलर्स किमतीचे शेअर्स खरेदी केले असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. रीड फेसबुक बोर्डाचा सदस्य असून शेअर खरेदी केल्याचे जाहीर करणारा तो पहिला सदस्य ठरला आहे. मे महिन्यात फेसबुकचा पब्लीक इश्यू आल्यानंतर फेसबुकचा शेअर ४५ टक्कयांनी घसरला आहे. सुरवातीला ३८ डॉलर्सला विकला गेलेला हा शेअर काल २०.७२ डॉलर्सवर आला होता. गुंतवणूकदारांचा फेसबुकवरचा विश्वास घसरल्याचेच हे लक्षण असल्याचे मानले जात आहे.

अशावेळी कंपनी बोर्डाच्या सदस्याने मोठ्या संख्येने कंपनीत गुंतवणूक करणे म्हणजे कंपनीवरचा विश्वास दाखविण्यासारखे असते व परिणामी गुंतवणूकदारांनाही गुंतवणूक करण्यास त्यातून धीर मिळत असतो. हा प्रकार नवा नाही. सिक्युरिटी अॅन्ड एक्स्चेंज कंपनीकडे रीडने गुरूवारी शेअर संबंधीची कागदपत्रे सादर केल्यानंतर ही बातमी जाहीर करण्यात आली आहे. रीड ने २१.०३ डॉलर्स प्रति शेअर प्रमाणे ४८ हजार शेअर्स खरेदी केले आहेत असे समजते.

Leave a Comment