महाराष्ट्रात दहीहंडी उत्साहात

‘ बोल बजरंग बली की जय ‘ च्या जयघोषात थरांवर रचले जात असलेले थर … रिम ​ झिम बरसणाऱ्या पावसात गोविंदांसोबतच प्रेक्षकांचाही टिपेला पोहोचलेला उत्साह … ठराविक एक दोन मंडळांची मक्तेदारी मोडीत काढत मुंबई , ठाण्यातील अनेक गोविंदा मंडळांनी आठ आणि नऊ थरांची गाठलेली उंची … यात कळसाध्य झाला तो ‘ जय जवान ‘ च्या लिम्का आणि गिनीज बुकातील विश्वविक्रमी नोंदीचा ! त्यामुळे शुक्रवारी धमाल वातावरणात राज्यभर साजरा झालेला दहीहंडीचा उत्सव ‘ ऐतिहासिक ‘ ठरला !

‘ उत्साह ‘ सेलि ​ ब्रिटींचा

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीचे केंद्र ठाण्याकडे सरकले असले तरी , मुंबईतही सकाळपासून दादर , वरळी , घाटकोपर , कुर्ला , बोरीवली , मागाठणे , दहिसर , कोरा केंद्र या भागात जोरदार गर्दी होती . सेलि ​ ब्रिटींची लक्षणीय उपस्थिती हे यंदाच्या दहीहंडीचे मुख्य आकर्षण ठरले . अभिनेता अक्षय कुमार याने राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत मराठीत भाषण करून टाळ्या मिळवल्या . यंदा मुंबईतील पंधराहून अधिक गोविंदांनी आठ थर यशस्वीरित्या रचण्याचा मान मिळवला . वडाळा अष्टविनायक , यंग उमरखाडी , प्रेमनगर चुनाभट्टी , जोगेश्वरी शिवटेकडी अशा मंडळांनी मुंबई गाजवली . साठहून अधिक मंडळांनी सात थर तर शंभरहून अधिक मंडळांनी बक्षिसांची लयलूट केली . नाना पाटेकर , पुष्कर श्रोत्री , विजय दामले , तुषार दळवी , अवधूत गुप्ते , मानसी नाईक , नेहा पेंडसे , स्मिता तांबे , आणि संजय नार्वेकर यांनीही ठिकठिकाणच्या दहीहंडीला हजेरी लावली होती .

विश्वविक्रमी जवान

दहा थरांच्या विक्रमाचे आव्हान स्वीकारून मैदानात उतरलेल्या गोविदा पथकांनी यंदा लिलया ‘ नऊ ‘ थर लावले . जोगेश्वरीच्या ‘ जय जवान ‘ ने ठाण्यात संस्कृती आणि संघर्ष या दोन्ही ठिकाणी नऊ थरांचा विक्रम केला . संस्कृती ‘ च्या मैदानात केलेल्या विक्रमाची नोंद लिम्का आणि गिनीज अशा दोन्ही रेकॉर्ड बुकमध्ये झाली . ‘ जय जवान ‘ ने नऊ थर उभारताना ४३ . ७४ फूट उंची गाठल्याने त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली . ‘ गिनीज बुक ‘ चे प्रति ‌ निधी नितीन शुक्ल यांच्या उपस्थितीत या रेकॉर्डची नोंदणी करण्यात आली ! गिनीज बुकातील नोंद नवा पण , स्पेनशी बरोबरी करणारा विक्रम अशी झाली आहे . त्याचबरोबरीने बोरीवलीच्या ‘ शिवसाई मंडळा ‘ ने रघुनाथ नगरमधील रवींद्र फाटक यांचा संकल्प आणि वर्तकनगरातील आ . प्रताप सरनाईक यांच्या ‘ संस्कृती युवा प्रतिष्ठान ‘ या दोन्ही ठिकाणी ‘ नऊ ‘ लाई पेश केली . माझगावच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘ संकल्प ‘ च्या उत्सवात नवाचा थरार साकारला .

Leave a Comment