
आग्रा, दि. ९ – मंगळवारी (ता. ७) रात्री स्टेट बँक ऑफ इंडियाचे ३० लाख रुपयांची रोकड जमा असलेले एटीएम मशिन जळाल्याची घटना घडली. ही घटना आग्रापासून २० किमी अंतरावर असलेल्या इत्मादपूर येथे घडली असून, अग्निशामन दलाला येण्यास उशीर झाल्याने सर्व पैशाचे नुकसान झाले.
