बारावीच्या विद्यार्थ्याने शोधला नवा धूमकेतू

दिल्ली: दिल्ली येथे बारावीच्या वर्गात शिकणार्‍या एका विद्यार्थ्याने नासा आणि सोहो वेधशाळेकडून आलेल्या माहितीचे विश्लेषण करून एक नवा धूमकेतू शोधला आहे. या धूमकेतूचे ‘सोहो २३३३’ असे नामकरण करण्यात आले आहे.

दिल्लीच्या एल्कन पब्लिक स्कूल येथे बारावीच्या वर्गात शिकणार्‍या प्रफुल्ल शर्मा याने अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आणि युरोपियन युनियनची वेधशाळा सोहो यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून हा धूमकेतू शोधला. या संशोधनाला ब्रिटीश अंतराळ विज्ञान संस्थेने मान्यता दिली आहे. हा धूमकेतू सन २००७ मध्ये सूर्याजवळ आलेल्या मेचोल्झ या धूमकेतूपासून फुटून बनलेला असावा असा संशोधकांचा कयास आहे.

प्रफुल्ल हा दिल्लीस्थित सायन्स पॉप्युलरायझेशन असोसिएशन ऑफ कम्युनिकेटर्स अँड एज्युकेटर्स या संस्थेशी संबंधित आहे. ही संस्था धूमकेतूचा अभ्यास करणार्‍या आंतरराष्ट्रीय यंत्रणेचा भाग आहे.

Leave a Comment