टोल आणि मराठी शाळांच्या प्रश्नाबाबत राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

मुंबई: टोल आणि मराठी शाळांच्या प्रश्नासंबंधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. टोल संदर्भात बहुतेक सर्व मुद्द्यांबाबत मुख्यमंत्री सहमत असल्याचे ठाकरे यांनी भेटीनंतर पत्रकारांना सांगितले.

राज्यातील टोल नाक्याच्या नावावर चाललेली लूट मनसेने उघड केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्नही केला. मात्र मुख्यमंत्र्यांनी राज यांच्याशी सहमती दर्शवून भुजबळ यांना धक्का दिला आहे.

पूर्वी रस्त्याच्या बांधकामाचा खर्च हा प्रकल्प किंमत म्हणून गृहीत धरला जात असे. आता रस्त्याच्या कंत्राटदाराने घेतलेल्या कर्जाचे व्याज, रस्त्याची देखभाल; दुरुस्ती; टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांचा पगार; अशा अनेक बाबी त्यात समाविष्ट करून ही किंमत प्रत्यक्ष खर्चाच्या चार ते पाच पट दाखविली जाते; हे ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

मराठी शाळांचा प्रश्न सोडविण्यास शासनाने प्राधान्य द्यावे; असेही ठाकरे यांनी सांगितले.

Leave a Comment