झोपेच्या गोळ्या भविष्यात धोकादायक

झोप न येणाऱ्या आजारावर झोपेच्या गोळ्या फायदेशीर नसतात. अर्थात हा कोणताही उपचार होत नाही. भविष्यात हे तुमच्यासाठी धोकादायक असते. हे मत एका निद्रा तज्ज्ञांनी व्यक्त केले. 
sleep
ऑस्ट्रेलियाच्या फ्लिंडर्स विद्यापीठात मनोविज्ञान विभागाशी संबंधित प्रा. लियोन लेकचे म्हणणे आहे की, बहुतांश लोक जे झोपेच्या गोळ्या घेतात त्यांना तरीही चांगली झोप येत नाही. याने काही वेळेसाठी आराम तर मिळतो; परंतु याचा परिणाम लोकांचा यावर अवलंबुन राहण्यात होतो. 
sleep1
त्यांनी म्हटले की, झोपेच्या गोळ्या थोड्या वेळेसाठी आराम पोहचवते परंतु जेव्हा लोक या गोळ्या घेणे बंद करतात त्यांनी आपली रात्र त्रासात घालावी लागते आणि त्यांना वाटते की, विना औषधाने त्यांना झोप येणार नाही. हे क्रेडिट कार्डवर काही झोप खरेदी करण्यासारखे आहे ज्याची किंमत जास्त प्रमाणात चुकता करावी लागते. अशात भविष्यात हे तुमच्यासाठी धोकादायक असते.
sleep2
परंतु लोकांनी हे समजण्याची गरज आहे की, झोप एक दिर्घ अवचेतन अवस्था नाही. आपल्याला झोपेच्या वेगवेगळ्या टप्प्यातून जावे लागते. अगोदर गाढ झोपेचा टप्पा जो ८० ते ९० मिनीटानंतर, साधारण झोप जी स्वप्न पाहण्याच्या टप्प्यात परिवर्तीत होते आणि आपण रात्रभर तीन किंवा चार टप्प्यातून जातो.लोक अनियमित जीवनशैलीला अनिद्रा मानतात आणि त्यांचे म्हणणे आहे की, पडल्यानंतर जर १५ मिनीटापर्यंत झोप आली नाही, तर उठायला हवे.

 

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment