
लंडन, दि. १० – अमेरिकेच्या महिला संघाने ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या फुटबॉल स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवताना लंडन ऑलिम्पिक स्पर्धेचे सुवर्ण पदक आपल्या नावे केले. अंतिम लढतीत अमेरिकेने जपानला २-१ ने मात देऊन तिसर्यांदा सुवर्ण पदकावर कब्जा जमवला. अमेरिकेकडून दोन्ही गोल मिडफील्डर कार्ली लॉयडने केले तसेच जपानकडून एकमात्र गोल यूकी ओगिमीने सामन्याच्या ६३व्या मिनिटात केला.
