अजमल कसाब- जुन्दलनी एकमेकांना ओळखले

मुंबई दि.१० – मुंबईवर २६/११ ला झालेल्या हल्ल्यातील एकमेव जिवंत सापडलेला अजमल कसाब आणि या हल्ल्याचे पाकिस्तानांतून नियंत्रण केलेला व सध्या मुंबई पोलीसांच्या ताब्यात असलेला अबू जुन्दल आमने सामने आले व दोघांनीही एकमेकांना ओळखले असे समजते.मुंबई पोलिसांनी शासनाकडे कसाबची चौकशी करण्याची परवानगी मागितली होती व शासनाने ती दिली होती.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कसाबला आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले असून तेथेच जुन्दलला नेण्यात आले. तेव्हा कसाबने प्रशिक्षण देणारा, हिंदी शिकविणारा आणि मुंबईची माहिती देणारा म्हणून जुन्दल ला ओळखले तर जुन्दालनेही प्रशिक्षित केलेल्या तेरा जणांपैकी कसाब एक असल्याचे सांगितले.तसेच मुंबई हल्ल्यासाठी निवडला गेलेला हा अतिरेकी असल्याचे स्पष्ट केले.

पोलिसांनी सुमारे दीड तास या दोघांची चौकशी केली असून दोघांनी दिलेल्या माहितीतील साम्य आणि फरक तपासून पहिला जाणार आहे असे एका वरिष्ट अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Comment