मंगळाच्या भूपृष्ठाखाली आढळली टेकटोनिक प्लेट

लॉस एंजलीस: मंगळाच्या भूपृष्ठाखाली पृथ्वीप्रमाणेच टेकटोनिक प्लेट अस्तित्वात असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. मंगळाच्या भूपृष्ठाची उपग्रहाने पाठविलेली छायाचित्रे पाहून या संशोधक या निष्कर्षाला पोहोचले आहेत.

केलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक प्रा. एन यीन यांनी नासाने प्रक्षेपित केलेला उपग्रह थेमीस याद्वारे आलेल्या छायाचित्रांचे विश्लेषण केले. तसेच मार्स रेकगनाईझेन्स ओर्बिटर कडून मिळालेल्या छायाचित्रांचाही अभ्यास प्रा. यीन यांनी केला. या छायाचित्रांद्वारे मंगळाच्या भूपृष्ठाखाली टेकटोनिक प्लेट सरकाल्याची घटना घडल्याचे आढळून आले आहे. यापूर्वी टेकटोनिक प्लेट केवळ पृथ्वीवरच अस्तित्वात असल्याचा समज होता.

मंगळावरील टेकटोनिक प्लेट या प्राथमिक स्वरूपाच्या आहेत. या प्लेटच्या अभ्यासाने पृथ्वी पूर्वी कशी दिसत असेल याचा अंदाज येऊ शकतो; असे प्रा. यीन यांनी सांगितले.