गोल्ड मेडलच्या अशा संपुष्टात

ओलोपिंक स्पर्धेचे शेवटचे तीनच दिवस शिल्लक राहिले आहेत. भारताच्या पदरात आतापर्यंत चार ‘मेडल’ पडले आहेत. या स्पर्धेत तीन कांस्य तर एक ब्रांज मेडल मिळाले आहे. आतापर्यतचा भारतीय संघाचा प्रवास पाहता शेवटच्या तीन दिवसात आता गोल्ड मेडल मिळवणे स्वप्नच राहणार असे वाटत आहे.

सेमीफायनलपर्यंत मेरीकोम पोहचली होती त्यामुळे या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून देईल असे वाटत होते. मात्र ती पराभूत झाली. दुसरीकडे बॉक्सर देवेंद्र सिंह क़्वॉटर फायनलमध्ये पोहचला होता मात्र त्याला ही हार पत्करावी लागली आहे. त्यापूर्वी गतवेळेसचा पदक विजेता विजेंदर सिंह पराभूत झाल्याने भारताच्या पदरात पाचवे ‘मेडल’ पडणार कि नाही याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

केवळ आता कुस्ती हा प्रकार शिल्लक राहिला आहे. गतवेळीचा कांस्य पदक विजेता सुशील कुमारच्या कामगिरीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे महीला कुस्तीपटू गीता फोगट हिला कांस्य पदक विजयाची संधी होती मात्र तिने ती संधी गमवली. तर उंच उडी स्पर्धेत सहाना हीची घसरण झाल्याने मेडल मिळण्याची अशा आता जवळपास संपुष्टात आली आहे. त्यामुळे यावेळेस भारतीय संघाचे सुवर्ण पदक मिळविण्याचे स्वप्न भंगणार असे दिसते.

Leave a Comment