इम्रान खानला जीवे मारण्याची धमकी

इस्लामाबाद, दि.१० – पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि नेता इम्रान खानला तालिबानने जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

अमेरीकेच्या ड्रॉन हल्ल्याच्या विरोधात तालिबानच्या असलेल्या प्रभाव क्षेत्रात इम्रान खानने निदर्शने केल्यास त्याची हत्या करण्यात येईल, असे तालिबानने म्हटले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या ड्रॉन हल्ल्याला तालिबानही विरोध करत आहे. तालिबानच्या या धमकीमुळे पाकिस्तानात आश्चर्य व्यक्त होत आहे. 

इम्रान खान स्वत:ला उदारमतवादी म्हणवतो म्हणून आम्ही त्याला विरोध करत असल्याचे तालिबानचे प्रवक्ते अहसानुल्लाह अहसन यांनी म्हटले आहे. उदारमतवादी म्हणजे ज्यांची धर्मावर निष्ठा नाही असे. त्यामुळे इमरान खान येत्या निवडणूकांमध्ये सहभागी झाल्यास आमचे मानवी बॉम्ब त्याना लक्ष करतील असेही अहसन यांनी एका मुलाखतीत सांगितले. 

Leave a Comment