अंडर १९ विश्वचषकात भारताची पहिली लढत वेस्टइंडीजशी

टाउन्सविले, दि.११ – भारत आयसीसी अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकात आपला पहिला सामना रविवारी वेस्टइंडीजशी खेळेल तसेच तीन वेळाचा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया शनिवारी उद्घाटन सामन्यात इंग्लंडशी सामना करेल. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत खुप चांगले प्रदर्शन केले आहे.

त्याने २००० व २००८ मध्ये विजेतेपद जिंकले होते तसेच २००६ मध्ये तो अंतिम लढतीत पोहचण्यात यशस्वी झाला होता. भारतीय कर्णधार उन्मुक्त चंदने म्हटले की, त्याचा संघ स्पर्धेसाठी पूर्णपणे तयार आहे. संघ खुप चांगल्या पद्धतीने तयार आहे. आम्ही मागील काही महिन्यात तीन स्पर्धा खेळल्या आहे. भारतात चारदेशीय स्पर्धा, ऑस्ट्रेलियामध्ये आणखी एक स्पर्धा तसेच मलेशियामध्ये अशिया चषक. आम्ही पहिल्या दोन स्पर्धा जिंकल्या तसेच तिसर्यात संयुक्त विजेता राहिलो.’

उन्मुक्तने म्हटले, ’आमच्या खेळाडूंना एकमेकांसोबत खेळण्याचा अनुभव असून आमचे मनोबल खुप वाढलेले आहे. आमची दृष्टी आता विश्वचषकावर असून अपेक्षा आहे की, आम्ही २००० व २००८ प्रमाणे विजेतेपद जिंकण्यात यशस्वी राहु.’ 

त्याने म्हटले, ’आव्हान सोपे नाही कारण येथे खुप चांगले संघ भाग घेत आहेत. आम्ही आताच एप्रिल २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये खेळलो होतो आणि याचा आम्हाला फायदा मिळेल. आम्हाला ऑस्ट्रेलियाई परिस्थितीशी सामंजस्य बसवण्यात जास्त वेळ लागणार नाही.’ 

Leave a Comment