फेसबुकवर जास्त मित्र असणे घातक

लंडन, दि. ९ – फेसबुकवर जास्त मित्र असणे हे आजकाल प्रतिष्ठेचे समजले जाते. मात्र आता जास्त मित्र असणे हे घातकही ठरू शकते. मित्र जास्त असल्यास समाजोपयोगी कार्यासाठी केले जाणारे माहितीचे आदानप्रदान फारसे होत नाही, असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. 

आपले ऑनलाइन सोशल नेटवर्क खूप विस्तारलेले असते तेव्हा एखाद्या कार्यासाठी मदत किंवा दान करण्याबाबत माहिती एकमेकांना देण्यासाठी आपण बर्याचदा इतरांच्या भरवशावर राहतो. त्यापेक्षा समान आवडीनिवड असणार्या लहान गटात अशा माहितीची देवाणघेवाण तत्काळ होते आणि त्याचा उपयोगही होतो, असे आढळून आले आहे. 

समजा फेसबुकवर माझे काही मित्र आहेत,त्या मित्रांचेही काही मित्र आहेत आणि असा प्रचंड विस्तार आहे. अशा वेळी एखाद्या समाजकार्यासाठी दान करण्याचे आवाहन करण्यात येते तेव्हा ही माहिती किती वेगाने पसरवली जाते याचा अभ्यास मला करायचा होता. अशा विशाल नेटवर्कमध्ये माहिती परस्परांना देण्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलली जाते. त्यासाठी स्वत: काही प्रयत्न करण्याचे टाळले जाते.  

 

Leave a Comment