वॉशिंग्टन, दि.९ – भारताला लक्ष्य करून पाकिस्तान आपल्या अण्वस्त्रामध्ये सातत्याने बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहे अशी खळबळजनक माहिती अमेरिकन काँग्रेसने आपल्या एका रिपोर्टमध्ये दिली आहे. पाकिस्तान भारताविरुद्ध जंग छेडण्याच्या प्रयत्नात असू शकते, असे या रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे.
पाकमध्ये अणु क्षेपणास्त्रांची निर्मिती जोरात
या अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की आपल्याला भारताकडून धोका आहे आहे आणि आपण घाबरलो आहे, असा दिखाव्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे.
भारताच्या अणु संशोधनात होत चाललेली प्रगती पाहून आपल्या बचावासाठी अण्वस्त्रसाठी पाकिस्तानने कंबर कसली आहे. या हत्यारांच्या वाहतुकीसाठी वाहनांची संख्याही वाढविण्यात येत असल्याचे व भविष्यात इस्लामाबाद यासाठी आणखी तेजीने प्रयात्न करण्याची शक्यताही या रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे.
