जगनमोहन यांची याचिका फेटाळली

नवी दिल्ली,दि.९ – वायएसआर काँग्रेसचे नेते वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर जगनमोहन यांनी या अटकेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

रेड्डी यांनी जामीन मिळण्यासाठी या आधीही सीबीआयच्या विशेष न्यायालयात आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र दोन्ही वेळा न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती.